You are currently viewing आठवण

आठवण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना*

 

*आठवण*

 

 

अवचित एका संध्याकाळी

तुझी आठवण गहिरी येते

आणि हरवता त्यांत स्वत: ला

माझी मलाच मि सांपडते

 

नकळत कांही स्मृती वेचता

हळूच मन ही हळवे होते

आणि कोवळ्या त्या वळणावर

सहज पणाने उगा थांबते

 

काय म्हणू मी या प्रेमाला

विसरण्यास ही कधि विसरते

त्या थांब्यावर भिजण्या साठी

अंतरात अजुनी आतुरते

 

वाट पहाते उगाच झुरते

अवचित सारे तुला आठवते

मग विरह संपता मन बावरते

स्वप्नाहुन जग सुंदर दिसते

 

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा