You are currently viewing जि. प.शाळा हळवल नं.२ मध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात

जि. प.शाळा हळवल नं.२ मध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात

कणकवली

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागामार्फत शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन संपूर्ण राज्यभर करण्यात आले आहे. याच अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा हळवल नं.२ मध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशालेत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतीय परंपरेनुसार यथोचित स्वागत करण्यात आले.

दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी बंद होत्या त्यामुळे इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विध्याथ्यांचे नुकसान झाले होते हेच नुकसान भरून कढण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन शिक्षण विभाग महाराष्ट्र यांच्या मार्फत करण्यात आले आहे. यावेळी हळवल उपसरपंच अरुण राऊळ, केंद्र प्रमुख अनंत राणे, मुख्याध्यापक सुतार सर, सहशिक्षक स्वप्नील सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष उमेश परब, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्षा रिया कदम आदींसह ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा