You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथील कलाशिक्षक मंदार चोरगे आदर्श शिक्षक तर शिक्षकेतर कर्मचारी रत्नाकर फुटक आदर्श सेवक पुरस्काराने सन्मानित

अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथील कलाशिक्षक मंदार चोरगे आदर्श शिक्षक तर शिक्षकेतर कर्मचारी रत्नाकर फुटक आदर्श सेवक पुरस्काराने सन्मानित

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघांच्या वतीने करण्यात आला सत्कार

वैभववाडी प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील माध्यमिक शिक्षकांची संघटना म्हणून परिचित असणारी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ या संघटनेचा जिल्हा मेळावा सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न झाला. यावेळी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अभ्यासपूर्ण व त्यागमय वृत्तीने कार्याचा आदर्श ठसा उमटवल्या बद्दल अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीचे कलाशिक्षक मंदार सदाशिव चोरगे यांना सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर रत्नाकर फुटक यांना ‘आदर्श सेवक ‘पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल वैभववाडी तालुका यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.


यावेळी संस्था अधीक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी.एस. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा