अनुभवी प्रशिक्षक देणार प्रशिक्षण
सावंतवाडी :
सह्याद्री स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे सावंतवाडी येथे उन्हाळी सुट्टीतील बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. सदर शिबिर 2 ते 31 मे या कालावधीत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. सदर उन्हाळी प्रशिक्षण सकाळच्या सत्रात होणार असून नियमित प्रशिक्षण दररोज सायंकाळी चार सत्रात सुरू राहणार आहे.
या शिबिरात अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. यात शारीरिक व्यायामही समाविष्ट आहे. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण केले जाते, तसेच कामगिरीच्या जोरावर प्रगत प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. या उन्हाळी सुट्टीतील प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्याचे आवाहन सह्याद्री स्पोर्ट्स तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती व प्रवेशासाठी सुमुख चव्हाण 9920590878 यांच्याशी संपर्क साधावा.
कुडाळ सावंतवाडी जिम्नास्टिक प्रशिक्षण – सह्याद्री स्पोर्टस् बियॉण्ड स्पोर्टस् च्या व्यवस्थापनाखाली सिंधुदुर्गात सावंतवाडी आणि कुडाळ येथे सुरू असलेल्या जिम्नास्टिक प्रशिक्षण शिबिराला मुलांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. अजूनही या प्रशिक्षण शिबिरात सहभागी घेता येईल असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.
सह्याद्री स्पोर्ट्स बियॉण्ड स्पोर्ट्स तर्फे सुरुवातीला सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये प्रशिक्षण सुरू करण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ कुडाळ येथेही प्रशिक्षण सुरू करण्यात आले. त्याचा शुभारंभ 18 एप्रिलला करण्यात आला कुडाळ येथे कराची महाराष्ट्र शिक्षक प्रसारक मंडळ आयोजित आणि सह्याद्री स्पोर्टस् बियॉण्ड स्पोर्टस् च्या व्यवस्थापनाखाली जिम्नास्टिक प्रशिक्षण शिबिर 18 एप्रिल पासून कुडाळ हायस्कूल इंग्रजी माध्यम अमृत महोत्सव इमारतीत सकाळी 8.30 ते 11 या वेळेत सुरू झाले आहे. वय वर्षे 4 पासून पुढील मुला-मुलींना या प्रशिक्षणात सहभागी करून घेतले जात आहे.
या प्रशिक्षणाची अधिक माहिती आणि सहभागासाठी संतोष वेंगुर्लेकर 9619656206, मानसी जोशी 9820112743 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.