You are currently viewing ऋषी देसाई यांना नांदेडचा प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

ऋषी देसाई यांना नांदेडचा प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

30 एप्रिल रोजी कंधार येथे ना.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार प्रदान सोहळा

पत्रकारांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचा सन्मान झाला पाहिजे या उदेशाने कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापण दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय , मराठवाडा स्तरीय व नांदेड जिल्हातील 16 तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार देवुन त्यांचा गौरव केला जातो.हा पुरस्कार वितरण सोहळा दि30एप्रिल रोजी सकाळी 10-30 वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कंधार येथे होणार आहेत.

कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान कंधारच्या वतिने दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार देवुन त्यांचा गौरव केला जातो. पुरस्कार 2021 चे मानकरी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण राज्यस्तरीय पुरस्कार लोकशाही न्यूज चे वृत्तनिवेदक ऋषी देसाई (मुंबई ) यांना तर बाळशास्त्री जांभेकर मराठवाडा भुषण पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी कालीदास जहागीरदार (नांदेड ) आणि दैनिक नांदेड चौफेरचे संपादक पठाण आरेफ खान यांना महात्मा फुले उत्कृष्ठ पत्रकारीता जिल्हास्तरीय पुरस्कारासह जिल्हयातील सोळा तालुक्यातील निवड झालेल्या पत्रकारांना पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.

ऋषी देसाई हे लोकशाही न्यूज मध्ये वृत्त निवेदक म्हणून कार्यरत असून यापूर्वी साम मराठी, झी 24 तास, टीव्ही नाईन मराठी या अग्रगण्य वृत्त वाहिन्यात त्यांनी मागील दशकभरात स्वताचा वेगळा ठसा उमटवला आहे. ‘समीक्षा’, प्राईम वॉच, डोळ्यांन पाहीन रूप तुझे, अशा कार्यक्रमाच्या माध्यमतून आपल वेगळेपण मांडताना लोकशाही न्यूजवरील ‘ऋषी देसाईचा फटका’ हा महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय व्यवस्थेवर कोरडे ओढणारा कार्यक्रम प्रेक्षकांसोबत टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटवर आपली छाप उमटवत घोडदौड करतोय. मालवणी बोलीभाषेतील लेखनासह राजकीय लेखन याबद्दलही ऋषी देसाई यांची विशेष ओळख आहे.

30 एप्रिल 2022शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पुरस्कार वितरण सोहळा सोहळा मोठ्या थाटात संपन्न होणार आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी लोकशाही न्यूज चे वृत्तनिवेदक ऋषी देसाई हे पत्रकारांना नव्या माध्यमातील पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =