You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालय, कै हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन

अर्जुन रावराणे विद्यालय, कै हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन

बुधवार दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी सायं.7:00 वाजता अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर होणार संपन्न

वैभववाडी प्रतिनिधी

वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी येथे यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाची सांगता वार्षिक स्नेहसंमेलनाने होणार आहे.
वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या महामारी नंतर विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व कलागुणांना वाव मिळावा आणि विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्राकडे आकर्षित व्हावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून कोरोना नंतरचे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन *बुधवार दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी अर्जुन रावराणे विद्यालयाच्या भव्य पटांगणावर मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे*.तरी वैभववाडी तालुक्यातील सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवाहन संस्था अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे व प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी. एस. सांस्कृतिक प्रमुख श्री सारंग एफ. एच. श्रीमती बोडेकर जे. एस. स्नेहसंमेलन प्रमुख श्रीमती भोवड पी. एन.श्रीमती जोशिलकर एम.एल. यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 1 =