जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अमिता शहा यांची अप्रतिम काव्यरचना
आरावलं कोंबडं उगवलं तांबड,
काकड आरतीने अवघं गाव उजाडलं;
पाण्याच्या सड्यांन परस दार ओलावलं ,
सारवल्या अंगणी रांगोळीने सजलं!
दावणीची गुर_ढोर जुडली कासऱ्याला,
धनी चाले बिगीबिगी माळव तोडायाला;
लुगडं जमिनीनं हिरव्या मखमालीचं नेसलं,
पांढऱ्या मोतीयांनी टच्च भरियलं!
लाल पायघड्यांनी गाव माझ नटल,
छोट्याशा टेकाडावर हळूच विसावल;
पाटे च्या पाण्यानं झुळुझुळू खळाळल,
घाम गाळून गाळून कोंब कोंब हसविल!
घंटानाद दूरवर मंदिरात निनादे,
आपुलकीच्या दिव्याने घरदार उजळते;
पारावरी गप्पांची मेहेफिल जागते,
माणुसकीच्या छायेखाली
गावकुस निद्रावते…
*अमिता शहा,सांगली*