You are currently viewing आमदार चषक राज्यस्तरीय ‘ज्युदो’ स्पर्धेत ठाणे संघाला सर्वसाधारण विजेतेपद तर क्रीडा प्रबोधिनी संघ ठरला उपविजेता

आमदार चषक राज्यस्तरीय ‘ज्युदो’ स्पर्धेत ठाणे संघाला सर्वसाधारण विजेतेपद तर क्रीडा प्रबोधिनी संघ ठरला उपविजेता

पुणे: प्रतिनिधी

महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्यावतीने आयोजित आमदार चषक ४८ वी राज्य ज्युनियर ज्यूदो स्पर्धेत ठाणे संघाने २९ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद जिंकले. क्रीडा प्रबोधिनी संघाला १९ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक या स्पर्धेच्या संयोजिका आहेत.


टिळक रोड येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या १०० किलो वरील वजन गटात पुणे जिल्हा ज्यूदो संघटनेच्या (पीडीजेए) आदित्य परबने पहिल्याच मिनिटांत मनवर्धनच्या आक्रमणास प्रतिडावाने उत्तर देत इप्पोन या पूर्ण गुणाने विजय संपादन केला. मनवर्धनला रौप्यपदकावर समाधान मानाव लागले. मुंबईच्या साहिल सुवर्णाने नाशिकच्या सुयश वैद्यला तर कोल्हापूरच्या राजवर्धन पाटीलने उस्मानाबादच्या ओंकार चौरेला नमवित कास्यपदक पटकाविले.
मुलांच्या ७३ किलो गटात नाशिकच्या जयेश शेटेने ओगोशी या डावावर कोल्हापूरच्या श्रेयस राथवाल याला नमवित विजय नोंदविला. कास्यपदकाच्या लढतीत पुणे जिल्हा ज्यूदो संघटनेच्या इशान धाडवेने सांगलीच्या पार्थ डांगेचा पराभव केला, तर अहमदनगरच्या लक्ष्मण धनगरने ठाण्याच्या चांद शेख यांस नमविले.
पारितोषिक वितरण समारंभ भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्पर्धा संयोजिका कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक, राजेश पांडे नगरसेवक अजय खेडकर, अर्चना पाटील, संदीप खर्डेकर, आश्विनी पांडे, मामा देशमुख, राजेंद्र काकडे, कुणाल टिळक, बापू मानकर, ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड धनंजय भोसले, महासचिव शैलेश टिळक, उपाध्यक्ष राजकुमार पुनकर, रवी पाटील, दत्ता आफळे, रवी मेटकर, सतीष पहाडे यासह स्पर्धेचे निरीक्षक अनिल सपकाळ उपस्थित होते.
तत्पूर्वी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष संजय शेटे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून उपस्थित असलेले निरीक्षक राजाभाऊ कोळी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना कार्यालयीन सचिव राजेंद्र घुले यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत प्रमोद कोंढरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छगन बुलाखे यांनी तर आभार प्रदर्शन अमित कंक यांनी केले.
*अंतिम निकाल पुढीलप्रमाणे :*
(अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कास्य पदक):
मुले : ५५ किलो गट : ओम हिंंगमिरे (क्रीडा प्रबोधिनी), आदित्य गोसावी (धुळे), सारंग शहाणे (अमरावती), अथर्व नरसाळे (अहमदनगर);
६६ किलो गट : हर्षवर्धन पाटील (सांगली), देव थापा (ठाणे), इशान सोनावणे (नाशिक), आयूष फाळके (मुबंई);
७३ किलो गट : जयेश शेटे (नाशिक), श्रेयस राथवाल (कोल्हापूर), इशान धाडवे (पीडीजेए), लक्ष्मण धनगर (अहमदनगर);
१०० किलो वरील वजन गट : आदित्य परब (पीडीजेए), मनवर्धन पाटील (ठाणे), साहिल सुवर्णा (मुबंई), राजवर्धन पाटील (कोल्हापूर).
*शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या लढती :*
(सर्व अंतिम : सुवर्ण, रौप्य, कास्य):
मुले : ६० किलो गट : प्रथम गुरव (मुबंई),सागर जाधव (यवतमाळ), योगेश शहाणे (अमरावती), प्रणित गोडसे (क्रीडा प्रबोधिनी); मुली : ४४ किलो गट : मिताली भोसले (कोल्हापूर), वैष्णवी पाटील (कोल्हापूर), प्रेरणा शेलार (क्रीडा प्रबोधिनी), गीता हांडे (वर्धा); ६३ किलो गट : गौतमी कांचन (पीडीजीए) श्रंखला रत्नपारखी (औरंगाबाद), शानवी खोत (मुबंई), मिनल खरे (गोंदिया).


उपविजेतेपदाचा करंडक भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्विकारताना क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू.

प्रतिक्रिया व्यक्त करा