वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत सोमवार दि.२५ एप्रिल २०२२ ते दि.२१ जून २०२२ या कालावधीत नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये सकाळी ६ ते ७.३० वा. पर्यंत मोफत योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी योग प्रशिक्षक डॉ. वसुधा मोरे व त्यांच्या सहकारी योग प्रशिक्षण देणार आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत करण्यात आले आहे.