महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जी जी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत गेले अनेक दिवस भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात जी आंदोलने होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली आहे.
कोवीड-१९ जागतिक महामारी च्या काळात सामान्य जनतेला होणाऱ्या आरोग्य विषयक त्रासच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेळोवेळी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले होते. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी मदत केंद्रही उभे केले .
आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या याच आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारला या अकार्यक्षम जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली करावी लागली किंबहूना मनसेच्या आंदोलनाने भाग पाडले.
तसेच यापुढेही जीथे सामान्य जनतेवर अन्याय होईल सामान्य जनतेला त्रास होईल तिथे मनसे स्टाईल खळ खट्याक होईल हे निश्चित.
नवनियुक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना सुद्धा विनंती आहे की कोरोना महामारीच्या काळात सिंधुदुर्गच्या सामान्य जनतेला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा मिळाव्यात ही विनंती असे संयुक्त प्रसिद्धीपत्रक मनसेच्या वतीने काढण्यात आले यात विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किंनळेकर सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या सह्या आहेत.