वैभववाडी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी वेंगुर्ल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.संजीव लिंगवत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या शासनमान्य व समाजमान्य संस्थेची मालवण तालुका शाखा स्थापन करण्यासाठी विशेष बैठक शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी ठिक ४.०० वा. डॉ.संजीव लिंगवत यांच्या निवासस्थानी वेंगुर्ला येथे संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व वेंगुर्ला तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची स्थापना, रचना, कार्यपद्धती व तालुका कार्यकारिणीची रचना याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थितांमधून सामाजिक कार्यकर्ते डॉ.संजीव लिंगवत यांची सर्वानुमते तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.पाटील यांनी त्यांना तालुका अध्यक्ष निवडीचे पत्र देऊन अभिनंदन करून पूर्ण कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.डॉ.आनंद बांदेकर, श्री.संजय पाटील,प्रा.सचिन परुळकर, श्री.मोहन मोबारकर, श्री.संजय वेंगुर्लेकर, श्री.विश्वास पवार व सौ. रुपाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.