You are currently viewing ग्राहक पंचायत महाराष्ट्र, मालवण तालुका अध्यक्षपदी श्री.रत्नाकर कोळंबकर यांची निवड-

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, मालवण तालुका अध्यक्षपदी श्री.रत्नाकर कोळंबकर यांची निवड-

वैभववाडी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या मालवण तालुका अध्यक्षपदी मालवणचे सामाजिक कार्यकर्ते श्री. रत्नाकर कोळंबकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या शासनमान्य व समाजमान्य संस्थेची मालवण तालुका शाखा स्थापन करण्यासाठी विशेष बैठक शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी ठिक ११.०० वा. श्री.शिवाजी वाचन मंदिर भरड नाका, मालवण येथे संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे जिल्हा संघटक सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.


यावेळी प्रा.श्री.एस.एन.पाटील व संघटक श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे नोंदणी, ध्येयधोरणे, उद्दिष्टे, कार्यपद्धती व तालुका रचनापध्दती याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उपस्थितांमधून सामाजिक कार्यकर्ते श्री.रत्नाकर कोळंबकर यांची सर्वानुमते तालुकाध्यक्ष म्हणून निवड जाहीर केल्यानंतर त्यांना तालुका अध्यक्ष निवडीचे पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी श्री.श्रीकांत राजाराम वेंगुर्लेकर,श्री.रत्नाकर रविंद्र कोळंबकर श्री.देविदास चव्हाण,
सौ.वैदेही महेश जुवाटकर, ॲड.सौ. सोनल अमित पालव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा