*सावंतवाडी :*
हिंद मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विशाल प्रभाकर परब यांची निवड करण्यात आली आहे. मराठा समाजाकरीता तन मन धन अर्पण करून कार्य करीत असल्याचे नोंद घेत हिंद मराठा महासंघ राष्ट्रीय संघटनेने ही नियुक्ती जाहीर केली आहे. राष्ट्रीय संस्थापक सदानंदराव भोसले व राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह गायकवाड
यांनी ही नियुक्ती केली आहे.
हिंद मराठा महासंघ देशपातळीवर कार्यरत असून मराठा समाज बांधवांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने हा महासंघ कार्यरत आहे. प्रत्येक राज्य, जिल्ह्यात महासंघ कार्यरत आहे. कोकण विभागातील या महासंघाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष पदाची धुरा विशाल परब यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावेळी विशाल परब यांनी मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने आपण कार्यरत राहणार आहे. तसेच मराठा समाजाच्या समस्या निवारणाचे काम केले जाणार असून उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने काम केले जाणार आहे, असेही परब यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष परब यांनी जिल्हा सरचिटणीस पदी विठ्ठल भिवा सावंत, जिल्हा कायदेशीर सल्लागार प्रवक्तेपदी ॲड. रामनाथ बावकर, जिल्हा सल्लागार म्हणून प्रभाकर परब यांची निवड केली आहे. यावेळी वेदिका परब, विठ्ठल उर्फ पांडू सावंत, प्रभाकर परब, विभावती चव्हाण, विनोद चव्हाण, प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.
तर विशाल परब यांच्या या नियुक्त बद्दल त्यांचे हिंद मराठा महासंघ (रजि) यांचे पदाधिकारी हेमंत शिंदे, ॲड किशोर बांदल देशमुख, गणेश शेडगे, किशोर केसरकर या पदाधिकाऱ्यांनी ही अभिनंदन केले आहे. या त्यांच्या निवडीबद्दल विशाल परब यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.