You are currently viewing 7 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

7 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार दि. 7 मे रोजी  जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सचिव दिपक म्हालटकर यांनी दिली.

या लोकअदालतीमध्ये प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडक्षम फौजदारी खटले, मोटार अपघात प्रकरणे, ग्राहक मंचाकडील प्रकरणे आणि दाखलपूर्व वाद प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. या लोकअदालतीमध्ये प्रकरणे मिटविल्यास पूर्ण कोर्ट फी परतावा मिळतो. प्रत्यक्ष व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने प्रकरणे मिटविता येतील.

अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण द्वारा जिल्हा व सत्र न्यायालय किंवा तालुका न्यायालये येथे प्रत्यक्ष किंवा 02362-228414, 8591903607 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा