कणकवली
ग्रामीण भागातील मुलांना गोष्टींच्या पुस्तकांबरोबर साहित्यिकांची ओळख होऊन भावी पिढी सुजान होण्यासाठी साईसेवा वाचन मंदिराचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन साईसेवा वाचन मंदिर संस्था अध्यक्ष दत्तात्रय वाळके यांनी केले. नांदगाव येथील साईसेवा वाचनमंदिराच्या 20 व्या वर्धापन दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त नांदगाव येथील साईसेवा वाचन मंदिरात स्वतंत्र बाल कक्ष सुरु करण्यात आला आहे.
या कक्षाचे उद्घाटन दत्तात्रय वाळके यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यकारिणी मंडळाचे सचिव मारुती मोरये, सदस्य श्रीपाद वाळके, रमजान पाटणकर, हसन वाघरे, सुुप्रिया शेलार, शुभम वाळके, व्यवस्थापक दिलीप जाधव ,ग्रंथपाल श्री. मोरजकर, शिपाई श्री. कासले यांच्यासह वाचक, ग्रामस्थ उपस्थित होते.