*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.अर्चना मुरुगकर यांची अप्रतिम गझल*
ये एकदा भांडून जा
मोडून जा तोडून जा
गर्दी किती माझ्या मनी
आठव तुझी घेऊन जा
क्षणभर तरी भेटून जा
शब्दातुनी स्पर्शून जा
वैराण मन आहे सुने
बागा नव्या फुलवून जा
गंधाळला बघ मोगरा
धुंदी नवी माळून जा
रात्रीस या बिलगून जा
तू चांदणे होऊन जा
अश्रू तरी गाळून जा
दु:खे मला देऊन जा
सौ.अर्चना रमेश मुरूगकर
9762863231
तळेगाव दाभाडे, पुणे