*माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेल्या कुडाळ शहरातील नाबरवाडी, गोधडवाडी, तुपटवाडी येथील रस्त्यांचा कार्यारंभ आदेश नुकताच नगरपंचायतीने दिला..*
कुडाळ नगरपंचायतीच्या स्वनिधीमधून तसेच नगरोत्थान निधीमधून माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या कार्यकाळात मध्ये अनेक विकास कामे मंजूर झाली होती. मात्र या कामाचे कार्यारंभ आदेश निघाले नव्हते. हे कार्यारंभ आदेश नुकतेच नगरपंचायतीने काढले आहेत. यामध्ये नाबरवाडी येथे दोन डांबरीकरण व खडीकरण रस्ते गोधडवाडी, तुपटवाडी येथील रस्ते मागील काळात मध्ये मंजूर करून घेण्यात आले होते. याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना पुढे येत आहे. आमदार वैभव नाईक यांनी कोणत्याही प्रकारची निधी मंजूर केलेली नाही. असे असताना या ठिकाणी आमदार वैभव नाईक यांचे फलक लावून जनतेची दिशाभूल केली जात आहे.
नगरपंचायतीच्या निधीमधून हे रस्ते मंजूर झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या रस्त्यांची भूमिपूजने श्रीफळ वाढवून बुधवार २० एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक राणे, ओंकार तेली, भाजपचे गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक एड. राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे, राजेश पडते, राजू बक्षी, श्रीराम काजरेकर, उमेश परब, दीपक प्रभावळकर, रहीम गोधड, अभिजीत सावंत, श्री.अय्यर आदी उपस्थित होते.