You are currently viewing संत कबीरांवरील ‘कहत कबीर’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

संत कबीरांवरील ‘कहत कबीर’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे राष्ट्र सेवा दल, कबनूर-कोरोची आणि सृजन प्रकाशनवतीने संत कबीरांवरील ‘कहत कबीर’ पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे डाॅ. मोहन सावंत यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी रूचिता पाटील यांनी संत कबिरांच्या दोह्याचे गायन केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.स्वागत आणि प्रास्ताविक अमोल पाटील यांनी केले.पाहुण्यांची ओळख पूजा केर्ले यांनी केली.
या कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांचा सत्कार पुस्तके देवून करण्यात आले. ‘कहत कबीर ‘ या पुस्तक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तक संकलकांचे मनोगतामध्ये सोहेल शेडबाळे आणि सौरभ पोवार यांनी जीवन, दोहे व कबीर विचार आणि आजची गरज अशी अनुक्रमे मांडणी केली.
यावेळी प्रमुख पाहुणे डाॅ. मोहन सावंत म्हणाले,” कबीरांचे जीवन आणि विचार यामधील एकरुपता हाच मोठा संदेश आहे.त्यांचे क्रांतिकारी विचार दोह्यांमध्ये बद्ध झाले आहेत.”
अध्यक्षीय मनोगतात मदन कारंडे म्हणाले,” कबीरांची विचारधारा ही परिवर्तनाचा पाया घालणारी आहे,त्यामुळे आजच्या काळात त्यांच्यावरील विविधांगी प्रकाश टाकणार्या पुस्तकांची गरज राहीलच.”
यावेळी सुनिल स्वामी, प्रा डाॅ अमर कांबळे, रोहित दळवी , दामोदर कोळी, अविनाश पोवार, रुकसाना शेडबाळे,आदित्य धनवडे, शहनाज मोमीन, सूरगोंडा पाटील,अमित कोवे, वैभवी आढाव,संतोषी पोवार तोहीद माणगावे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहल माळी यांनी केले. आभार अक्षय कांबळे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा