सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे, मुखअयालय सहचिटणीस सुदाम टाव्हरे व राज्य संघटक रमेश जंजाळ हे गुरुवार दि. 21 एप्रिल 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या अनुषंगाने दि. 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीमध्ये जिल्हा समन्वय समित्या व दुर्गा महिला मंच पुनगंठन, कल्याण केंद्राची प्रगती तसेच नवी कार्यसंस्कृती आदी विषयांवर चर्चा व माहिती देण्यात येणार असून पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन होणार आहे. या बैठकीस सदस्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे.