You are currently viewing कळसुली – शिरवल मार्गावर डंपरच्या धडकेत गाय जखमी…

कळसुली – शिरवल मार्गावर डंपरच्या धडकेत गाय जखमी…

भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपर चालकांवर कार्यवाही करा ग्रामस्थांनी मागणी..!

कणकवली

कळसुली- शिरवल तळेवाडी येथील बस स्टॉप नजीक श्री.प्रकाश गोविंद चव्हाण यांच्या मालकीची गाय असून या गाईला सकाळी १० च्या सुमारास भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपर चालकाने धडक देत पलायन केल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली जात आहे.

शिरवल तळेवाडी येथील श्री.प्रकाश चव्हाण यांची गाय जखमी अवस्थेत तळेवाडी बस स्टॉप रस्त्यानजीक गटारात जखमी अवस्थेत पडली होती. कणकवलीच्या दिशेने जात असताना सामाजिक कार्यकर्ते सुनील हरमलकर यांनी पशुवैद्यकीय दवाखाना शिवडाव येथील डॉ. सुकांती मुळे यांना माहिती दिली असता,सौ. मुळे यांनी तातडीने धाव घेत गायीला औषध उपचार केला असून, गायीचा जीव वाचवला आहे.

कळसुली गावातील दोन तरूणींचा याच मार्गावर रिक्षातुन कणकवलीच्या दिशेने जात असताना डंपर चालकाने हुलकावणी दिली असल्याने अपघात घडला होता.ही घटना ताजी असताना मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास गायीला धडक दिली असल्याने कळसुली शिरवल रस्त्यावर वारंवार डंपर चालक भरधाव वेगाने धावत असतात.या भरधाव वेगाने धावणाऱ्या या डंपर चालकांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे,असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या डंपर चालकांना वेळीच आवर घालायला हवा अशी मागणी ग्रामस्थांनमधून कली जात आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील हरमलकर,प्रकाश चव्हाण,अंकुश सावंत, संजय सावंत,दत्ताराम सावंत,सह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =