You are currently viewing बांदा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सल्लागारपदी नारायण पित्रे, साईराज साळगावकर

बांदा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सल्लागारपदी नारायण पित्रे, साईराज साळगावकर

बांदा

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,आजरा बांदा शाखा सल्लागारपदी येथील व्यापारी नारायण उर्फ शशिकांत पित्रे व सुवर्णकार तथा युवा सामाजिक कार्यकर्ते साईराज साळगांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आजरा मुख्य कार्यालय चेअरमन जनार्दन टोपले व सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा चेअरमन विजयकुमार मराठे, संचालक डॉ.श्रीपाद जोशी,अभय सातार्डेकर,सुधीर सिरसाट, शाखा व्यवस्थासपक भरत पाटील व कर्मचारी वृंद आदी मान्यवराच्या उपस्थित नेमणूक पत्र देण्यात आले.
मार्च मध्ये झालेल्या संचालक मंडळ मिटिंगमध्ये बांदा शाखा सल्लागारपदी १ एप्रिल २२ पासून नेमणूक केल्याचे मान्यवराच्या हस्ते पत्र देण्यात आले.

२ मार्च ला पंतसस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हचा अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते . गेल्या ३५ वर्षापासून बांदा शहरात अनेक वर्षात बांदा शहराच्या एकूणच विकासात आपले योगदान देणारे ज्येष्ठ नागरिक व्यापारी सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता. पित्रे व साळगावकर यांच्या निवडीने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा