You are currently viewing हातभार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तळवडे येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर

हातभार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तळवडे येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर

म्हाळाईवाडी महिला मंडळ, तळवडे आयोजक

सावंतवाडी:

येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी म्हाळाईवाडी आरोग्य केंद्र, शाळा नं. ९ नजीक तळवडे’ येथे हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्गच्या सौजन्याने म्हाळाईवाडी महिला मंडळाच्या वतीने ‘मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात मोफत नेत्र तपासणी करून नेत्र तपासणी करणात्यांना ५०% सवलतीच्या दरात’ चष्मा दिला जाईल. तसेच गरज असल्याचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल हे शिबिर २२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत असेल. तरीही सर्व गरजुनी या शिबीराचा लाभ घ्यावा. असे आव्हान हातभार चैरिटेबलट्स्ट आणि म्हाळाईवाडी महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात आले.
हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे संस्थापक सचिव 7875837568 तसेच म्हाळाईवाडी महिला मंडळाच्या प्रांजल शेखर आचरेकर 9405174462 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + eleven =