सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील न्यू-सबनीसवाडा येथील एका युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. भूषण अभिनंदन राणे (२६) असे त्याचे नाव आहे. घटनेनंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या घटनेची खबर येथील पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
संबंधित युवक कामावर सुट्टी असल्यामुळे घरीच होता. तर घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती. सायंकाळी उशिरा आई वडील कामावरून घरी परतले असता भूषण घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्याने दुपारच्या सुमारास हा प्रकार केला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. याबाबत येथील पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.