सामान्य लोकांना सुख म्हणजे काय हे समजत तर नाहीच पण मोठमोठ्या विद्वान लोकांना सुद्धा सुख हे मृगजळ आहे असे वाटते.याचे मुख्य कारण असे की,माणसे सुखाचा अमृतानुभव अनुभवण्याऐवजी ते सुखाच्या कल्पनेचा काल्पनिक भोग घेत असतात.सुखाची काही तरी कल्पना करून घेऊन त्याच्या पाठीमागे लागल्याने सुख हाताला लागेलच कसे?* आणि अशा प्रसंगी सुख हे मृगजळ आहे असे म्हणण्यात काय अर्थ आहे बरे? *लोक ज्या मार्गाने सुख शोधण्याचा प्रयत्न करतात त्याच्या नेमका उलटा मार्ग सुख मिळविण्याचा असतो.परंतु हा मार्ग लोकांना ज्ञात नसल्यामुळे लोकांना सुखाचा शोध लागत नाही.वास्तविक,ज्या जीवाला सुखाचा ध्यास लागलेला असतो आणि जो त्या सुख प्राप्तीसाठी कशाचाही व कोणाचाही दास व्हावयास तत्पर असतो,तो जीव स्वत:च पूर्णतःसुखस्वरूप असतो.सुख मिळविण्यासाठी माणूस जितके अधिक प्रयत्न करतो तितका तो सुखापासून दूरदूर फेकला जातो.याच्या उलट सुख मिळविण्याची धडपड करण्याचे माणसाने बंद केले व एका विशिष्ट सद्गुरूप्रणीत मार्गाने स्वत:च्या सुख स्वरूपाचे ज्ञान करून घेतले की त्याला सुखाचा साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष अनुभव तात्काळ येऊ शकतो.*
*म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात-*
१) *बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त।* *तया सुखा अंत नाही पार।*
*येऊनी अंतरी राहील गोपाळ।* *सायासाचे फळ बैसलीया।।*
२) *तुका म्हणे सुख देह निरसने।* *चिंतन चिंतने तद्रूपता।।*
🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏