You are currently viewing उदया सोमवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

उदया सोमवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्गनगरी – पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे उद्या दि. 28 मार्च 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

▪️सोमवार, दि. 28 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वा. चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने मालवणकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. मालवण बदंर – जेट्टी बंधारा पाहणी व फिश ॲक्वेरियमचे सादरीकरण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वा. मोटारीने कुणकेश्वर (ता. देवगड) कडे प्रयाण. दुपारी 12.15. वा. श्री. देव कुणकेश्वर दर्शन. दुपारी 12.25 वा. प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत श्री देव कुणकेश्वर मंदिर येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. मोटारीने देवगडकडे प्रयाण. दुपारी 01.00 वा. तहसिल कार्यालय, देवगड शेजारील प्रांगण येथे महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रस्‍त्यांचे भूमिपूजन व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 02.30 वा. राखीव. दुपारी 03.00 वा. मोटारीने वायंगणी ता. वेंगुर्लाकडे प्रयाण. दुपारी 04.30 वा. वायंगणी येथे कासव जत्रा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 05.00 वा. मोटारीने सागरतीर्थ, ता. वेंगुर्लाकडे प्रयाण. साय. 05.30 वा. फोमेंटो ग्रुप-भेट व पाहणी सायं. 06.00 वा. मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण. सायं. 06.15 वा. शासकीय विश्रामगृह इमारत नुतनीकरण विकासकामाचे भूमिपूजन, पाणबुडी प्रकल्प व जलपर्यटनासाठी प्रस्तावित जेट्टीची पाहणी, ऑब्जर्व्हेशन डेकची पाहणी, फिशींग व्हिलेज स्थळाची पाहणी (नवाबाग), मल्टीस्पेसीज हॅचरी व प्रस्तावित पर्यटन प्रकल्प जागेची पाहणी, फळसंशोधन केंद्र अंतर्गत कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्राची पाहणी, मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह, वेंगुर्ला. सायं. 07.15 वा. सिंधुरत्न समृध्द योजना लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. साय. 08.15 वा. मोटारीने कुडाळकडे प्रयाण. रात्री. 09.30 वा. कुडाळ येथे शिमगोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. रात्री. 10.30 वा. राखीव व मुक्काम

▪️मंगळवार, दिनांक 29 मार्च 2022 रोजी सकाळी 09.00 वा. मोटारीने लांजा, जि. रत्नागिरीकडे प्रयाण

प्रतिक्रिया व्यक्त करा