You are currently viewing 22 ते 24 रोजी आंदुर्ले देवीचा वाढदिवस सोहळा..

22 ते 24 रोजी आंदुर्ले देवीचा वाढदिवस सोहळा..

कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले येथील श्रीदेवी आंदुलाई येथे शुक्रवार दिनांक 22 ते रविवार 24 एप्रिल या कालावधीत वाढदिवस सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

🔹शुक्रवारी दिनांक 22 रोजी सकाळी 9.15 वा. श्रीं ची अभिषेक पूजा व कुंकूमार्चन व लघुरुद्र, सकाळी 11 वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12.30 वाजता आरती, तीर्थप्रसाद व महानैवेद्य दुपारी 3 वा. हरिपाठ, 5 ते 7 वा. भजन, रात्री 7.30 ते 9 वा. पालखी प्रदक्षिणा, रात्री 10 वा. दशावतारी नाटक.

 

🔹शनिवारी 23 रोजी सकाळी 7 वा. श्रींची अभिषेक पूजा व कुंकुमार्चन, सकाळी 8 वा. नवचंडी अनुष्ठान प्रारंभ, पुण्याहवाचन, देवता स्थापना, एकादशन्या व ओट्या भरणे, सकाळी 11 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12.30 वाजता आरती, तीर्थप्रसाद व नैवेद्य, दुपारी 3 ते 5.30 वा. महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ आणि हळदीकुंकू, सायंकाळी 5.30 ते 7.30 वा. स्थानिक भजने, रात्री 7 ते 9 वा. श्रींची पालखी, रात्री 9 वा. जलवा 2022.

 

🔹 रविवार 24 रोजी सकाळी 7 वा. श्रींचा अभिषेक पूजा व कुंकुमार्चन, सकाळी 8 वा. नवचंडीहवन, कुंकुमार्जन व पूर्णाहुती, एकादशण्या व ओट्या भरणे, सकाळी 11 वा. श्री सत्यनारायण महापूजा, 12.30 वा. आरती, तीर्थप्रसाद व महानैवेद्य, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, दुपारी 4 ते 6 वा. स्थानिक व निमंत्रित भजने, सायंकाळी 6 ते 8 वा. किर्तन, रात्री 8.30 वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा, 11.30 वाजता दशावतार नाटक आदी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

या कार्यक्रमाचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्रीदेवी अंजुरली पंचायतन मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 17 =