You are currently viewing ऊसाला पाणी देऊन देऊन

ऊसाला पाणी देऊन देऊन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी कृष्णा आर्दड यांची ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिहिलेली काव्यरचना*

*आज ऊसाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे…🎋🎋 16 महिने होऊनही हजारो एकर ऊस तसाच उभा आहे…🔥🔥आता करायचं काय… त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी खूप मोठ्या संकटात अडकला आहे…😭😭😭याला जबाबदार कोण…?*
*ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दु:ख आणि वेदना मांडणारी आणि या व्यवस्थेला जाब विचारणारी ही कविता आपल्या समोर ठेवतो आहे.*

*ऊसाला पाणी देऊन देऊन*
*आंबट झालाय जीव,*
*अन् भर उन्हाळ्यात सुध्दा साहेब*
*वाजू लागलंय हिव….*

*मार्च महिना संपलाय साहेब*
*ऊस चाललाय सुकून,*
*अन् कंबरही मोडलीय आमची*
*साहेबापुढं वाकून….*

*आतातरी सांगतो साहेब* *मनावरती घ्या,*
*ऊस घेऊन जा साहेब तुम्ही* *ऊस घेऊन जा…*
🙏🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️

*ह्याच्या- त्याच्या म्हस्क्या मारून*
*साहेबापुढं हात जोडून,*
*दखल कुणीही घेत नाही*
*मोठाल्यांचे नेले तुम्ही*
*मग आमचेच ऊस का नेत नाही…*

*साहेब आमच्या जाणीवांचा*
*तुम्ही सर्वे कधी केलाय का?*
*आम्ही ऊस लावला म्हणून काय*
*लय मोठा गुन्हा झालाय का?*

*आता तरी सांगतो साहेब टोळी धाडून द्या*
*ऊस घेऊन जा साहेब तुम्ही, ऊस घेऊन जा*
😪😪

*ऊस नाही गेला म्हणून साहेब*
*मी मुलाचं शिक्षण थांबवलंय,*
*अन् पुढल्या महिन्यात जमलेलं माझ्या*
*मुलीचं लग्न सुध्दा लांबवलंय….*

*कर्जबाजारी झालोय म्हणून साहेब*
*जग सारं हसू लागलंय,*
*अन् टेंशन घेऊन-घेऊन साहेब*
*डोक्यावर मोहोळ बसू लागलंय….*😡😡😫😫🤕😭

*किव थोडी करा साहेब* *आम्हालाही न्याय द्या,*
*ऊस घेऊन जा साहेब तुम्ही ऊस घेऊन जा….*

*आता नाही सहन होत साहेब*
*ऊसाला काडी लाऊन देईन,*
*अन् तुमच्या नावानं साहेब*
*मी ऊसातच माझा जीव देईन….*🎋

*मग नक्की या साहेब*
*तुम्ही पंचनामा करायला,*
*अनं माझ्या सरणाची राख*
*तुमच्या खिशामध्ये भरायला…*🎋🎋😭😫💥

*एक शाप नक्की देईल साहेब*
*तुमचं शेतीशिवाय कधीच भागणार नाही,*
*अनं तुम्ही गाळलेली साखर तुम्हाला*
*कधीच गोड लागणार नाही….*😫😭🎋🙇‍♂️🙇‍♂️

*झोप झाली असेल साहेब तर आतातरी जागे व्हा,*
*ऊस घेऊन जा साहेब तुम्ही ऊस घेऊन जा…..*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙇‍♂️

*कवी कृष्णा आर्दड*✍️
*राजाटाकळी, जालना*
*मो. 7410120335*

प्रतिक्रिया व्यक्त करा