You are currently viewing आंधळं प्रेम …!!

आंधळं प्रेम …!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आंधळं प्रेम …!!*

 

प्रेमांत मी…तुझ्या

डोळ्यांत माझ्या.. तू मावत नाही

आभासी कां असेना

तुझ्याविना एक क्षणही जात नाही

 

इंटिमेट तुझा …आधी येतो

नंतर …तू येतेस

अडकलेला.. उरला.. सुरला

जीव तू काढून घेतेस…!

 

अश्यावेळी सवयीच्या अंधारातून

एक फुलपाखरू येत

माझ्या गाॅगलच्या काळ्या काचेवर

अलगद येवून बसत ..!

 

कानांत माझ्या ते सांगत

बघ तिच्याकडे .. अन् सांगून टाक

तुझ्या मनातलं सार काही

मन मोकळं कसे …करू रे मी

तिला डोळे आहेत ..मला नाही …!

 

अरे काही कां असेना

कांही क्षण कां होईना

जग सुंदर भासले

अजाणतेने बालपणी डोळे मिटले

आज तिच्या करता

पुन्हा ते! उघडावेसे वाटले..!

 

स्पर्श तिचा कधीतरी

रस्ता ओलांडून देतांना होतो

तेवढाही तो पुरेसा असतो..!

इंटिमेट पांढऱ्या काठीवीना

दूर …….निघून जाईल

मी माझी…. नजर

तिच्या चेहऱ्यावर ठेवून जाईल..!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रेम तस आंधळंच असतं

डोळे उघडले की ते डोळसं होतं

 

चांदणछाया

प्रतिक्रिया व्यक्त करा