You are currently viewing *सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात २० एप्रिलला आरोग्य मेळावा

*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात २० एप्रिलला आरोग्य मेळावा

गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, वैद्यकीय अधीक्षकांचे आवाहन….

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालयात २० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व आजारांवर मोफत वैद्यकीय तपासणी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे.त्यामुळे शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनी केले आहे. या शिबिरामध्ये डॉक्टर्स उपस्थित राहून रुग्ण तपासणी व औषधोपचार करणार आहेत

यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय सावंत, डॉ. संदीप सावंत,स्त्रीरोतज्ज्ञ डॉ. मृदुला महाबळ, डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर,शल्यचिकित्सक डॉ पावसकर , डॉ गिरीश चौगुले,भिषक, डॉ. निर्मला सावंत, डॉ अभिजीत चितारी,मेंदुविकर तज्ज्ञ डॉ.अंबापुरकर,कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ लीना परुळेकर,अस्थिरोगतज्ञ डॉ कश्यप देशपांडे, डॉ रेवांसिद्ध खटावकर,त्वचारोग तज्ज्ञ डॉ चेतन म्हडगुत,दांतचिकित्सक डॉ समीर धाकोरकर,आयुष डॉक्टर्स आहारतज्ज्ञ श्रीमती पाखरे सेवा देणार आहेत. तसेच रुग्णांना विविध आजाराविषयी माहिती व जनजागृती करणेसाठी माहिती देणार आहेत.

श्री. सोन्सुर्लेकर ( समुपदेशक),असंसर्गिक आजार श्रीमती अदिती कशेलीकर(समुपदेशक),क्षयरोग श्री टिळवे,श्री गवस, सांसर्गिक आजार श्री साधले कौटुंबिक आरोग्य श्रीमती काळसेकर करणार आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा