हणमंत वडीये येथील येरळामाई जनसहयोग फाउंडेशनचा स्नेह वृद्धिंगत करण्याचा अनोखा प्रयत्न
आपलं गाव आपल्या नसानसात भिनलेलं असतं. आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो, तरी आपल्या मनातलं गाव आपल्याला नेहमीच खुणावत राहतं. गावाबाहेर राहीलेला प्रत्येक व्यक्ती आतून गावाशी जोडलेला असतो.
प्रत्येक वर्षी यात्रा व दिवाळी या सणाला नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असणाऱ्या सर्वांना मातृभूमीची ओढ लागलेली असते.
आपण गावी येतोही, पण चार सहा दिवस मिळालेल्या सुट्टीत गावातील सर्वांना भेटता येत नाही, ही खंत अनेकांच्या मनात असते.
यावर उपाय म्हणून येरळामाई जनसहयोग फाउंडेशनने गावच्या यात्रेनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यात नोकरी व्यवसायानिमित्त राहिलेल्या सर्वांच्या भेटीगाठी घडवून आणत आपल्या मित्रपरिवाराचा स्नेह वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे.
येरळामाई जनसहयोग फाउंडेशनचा स्नेह मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने शनिवारी, दिनांक 16 एप्रिल 2022 या दिवशी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद मराठी शाळा येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथी प्रा. मेजर पांडुरंग शितोळे सर यांच्या हस्ते संस्थेच्या लोगो चे अनावरण करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मारुती शिरतोडे सर यांनी उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन केले व अँड सुभाष मोरे (बापू), माजी प्राचार्य संजीव मोरे सर, अनुराधा मोरे (माई) यांनी विशेष मार्गदर्शन केले.
तसेच गावातील नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर असणाऱ्या युवक युवतींसोबतच गावातील ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावत स्नेह वृद्धिंगत करण्याच्या सोहळ्याला प्रोत्साहन दिले.
यावेळी इंजिनिअर श्री. निरंजन मोरे सर, PSI श्री. पवन मोरे साहेब, उपअभियंता श्री. सुहास मोरे, मराठी शाळेचे शिक्षक श्री. आप्पासाहेब जाधव सर, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. जयराम मोरे यांनी आपल्या भावना व मते व्यक्त करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांची ओळख प्रा. कॅप्टन डॉ शंकर माने सर यांनी करून दिली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री सुभाष मंडले यांनी केले व संस्थेच्या सहखजिनदार सौ. गितांजली मोरे यांनी आभारप्रदर्शन केले.
– सुभाष मंडले