राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांची उपस्थिती
कुडाळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेल्या आत्मनिर्भर अभियानातंर्गत विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. ही योजना तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी दि. २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती पासून ते महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत जनजागृती करण्यात आली. या अभियानाचा समारोप कार्यक्रम शुक्रवार दि. २ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी सभागृहात होणार आहे. या समारोप कार्यक्रमला भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भाई सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विनोद तावडे ४५मिनिटे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आत्मनिर्भर अभियानाचे जिल्हा संयोजक अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या समवेत आत्मनिर्भर अभियानाचे सचिव प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ऊर्फ भाई सावंत, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, प्रसन्ना कुबल, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे संयोजक बंड्या सावंत आदी उपस्थित होते. यावेळी काळसेकर यांनी केंद्र सरकारच्या कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली.