धर्म जगाचे कल्याण करू शकतो का ?
क्रमशः..
*” दुसऱ्यांना सुखी करता आले नाही तरी चालेल पण निदान त्यांचे दुःख तरी निर्माण करू नका, दुसऱ्यांची स्तुती करण्याची इच्छा नसेल तर निदान त्यांची निंदा तरी करू नका, दुसऱ्याच्या पायावर डोके ठेवण्याची इच्छा नसेल तर निदान त्यांच्या डोक्यावर पाय तरी ठेवू नका, दुसऱ्यांच्या मुखात अन्नाचा घालता येत नसेल तर निदान त्यांच्या मुखातील घास तरी काढून घेऊ नका.”*
ही साधी-सोपी गोष्ट करावयास ना खर्च, ना कष्ट, ना अडचण, ना कसली हरकत. असे असून सुद्धा एवढेच जरी माणसाने केले तरी एका बाजूने त्याला अगणित पुण्याची प्राप्ती होईल व दुसर्या बाजूने त्याने धर्माचे पालन, देवाचे पूजन व मानवजातीची सेवा केल्याचे श्रेय त्याला मिळेल. थोडक्यात,” तुम्ही सुखाने जगा, इतरांना सुखाने जगू द्या ” या धारणेला खरा धर्म असे म्हणतात. हेच आहे धर्माचे नेमके वर्म व अखिल मानव जात सुखी करण्याचे सामर्थ्य नेमके त्यातच आहे.
*– सद्गुरू श्री वामनराव पै.*