माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचा आरोग्य तपासणी शिबीर उपक्रम…
कुडाळ
मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनी हेल्थकेअर क्लिनिक, मुंबई व जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत सभागृह येथे मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व सचिव राजेश टंगसाळी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
सदर शिबिरास वेताळ बांबर्डे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अत्याधुनिक संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने संपूर्ण शारीरिक तपासणी, ऍक्युप्रेशर व फिजिओथेरपी आणि मधुमेह, थायरॉईड,कॅन्सर,सिरम कॅल्शियम,हिमोग्लोबिन आदी रक्त तपासणीचा सुमारे शंभराहून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला.
गावच्या सरपंच सौ संध्या मेस्त्री व उपसरपंच दिनेश कदम, ग्रामविकास अधिकारी बी.डी.पिंटो यांनी शिबिरासाठी उपस्थित डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व मनसे पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.मनसेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल वेताळ बांबर्डे वासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.