You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या दिमाखात साजरी

अर्जुन रावराणे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या दिमाखात साजरी

अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नादकर बी.एस. उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून श्री. शिंदे एस. बी यांनी आपल्या मनोगतात आंबेडकर याचे विचार आपण आत्मसात करणे गरजेचे आहे असे सांगितले . श्री. प्रभू, मरळकर, श्रीम. पाटील यांनी आपली विचार मांडले.
कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक ,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुळसणकर एस. टी.यांनी तर आभारप्रदर्शन श्री सावंत पी.जे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा