You are currently viewing गरड येथील तीन पत्ती जुगारासाठी वापरण्यात आलेली सदनिका त्या माजी लोकप्रतिनिधीची?

गरड येथील तीन पत्ती जुगारासाठी वापरण्यात आलेली सदनिका त्या माजी लोकप्रतिनिधीची?

*त्या माजी लोक्रतिनिधीचा प्रत्यक्ष जुगाराशी संबंध नाही, जागा मालक म्हणून पोलिसांकडून समज.*

 

सावंतवाडी शहरातील गरड येथे पोलिसांनी तीन पत्ती जुगारावर छापा टाकून चौघा संशयितांवर कारवाई केली. सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी स्वतः कारवाई करून चार संशयितांना अटक करत नोटीस देऊन जामिनावर मुक्तता केली. तीन पत्ती जुगार खेळताना अटक केलेल्या आरोपी सोबतच ज्या सदनीकेमध्ये तीन पत्ती जुगार खेळला जात होता त्या सदनिकेचा मालक असलेला माजी लोकप्रतिनिधी याला देखील पोलीस स्टेशन मध्ये बोलविण्यात आले. त्या माजी लोकप्रतिनिधीचा तीन पत्ती जुगाराशी प्रत्यक्ष सहभाग नसला तरीही लोकांचा सेवक म्हणून समाजात वावरताना आपल्या सदनिकांमध्ये हे काय गौडबंगाल चालू आहे याची माहिती सदनिकेचा मालक म्हणून ठेवणे आवश्यक होते. स्वतःच्या घरात, जागेत किंवा फ्लॅटमध्ये भाडेकरूंना ठेवतानाही त्यांची संपूर्ण माहिती घेणे व आपण भाड्याला, वापरास दिलेल्या जागेत काय चालते त्याच्यावर लक्ष ठेवणे ही मालकाची जबाबदारी असते, परंतु गरड येथे तीन पत्ती जुगारावर छापा टाकलेली सदनिका जर भाड्याने दिली होती तर सदर मालकाने त्या ठिकाणी काय चालते? ती कोणाला भाड्याला दिली? भाडेकरू कोण? याची माहिती घेतली होती का? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेले वर्षभर सदर सदनिकेमध्ये असेच जुगार सारखे गैरधंदे सुरू आहेत. त्यामुळे सावंतवाडी पोलिसांनी देखील त्याची गंभीर नोंद घेऊन चौकशी करून माजी लोक्रतिनिधींनीला समज दिली.

लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक कार्य करत असताना समाजात व्हाईट कॉलर वावरताना आपल्या हातून काही चुकीचं तर घडत नाही ना? याबाबत प्रत्येक लोकप्रतिनिधीने गंभीर असणे आवश्यक आहे. कारण समाजात वावरणारे युवक आपल्या लोकप्रतिनिधिंचाच आदर्श घेऊन पुढे जात असतात. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने समाजात, सामाजिक कार्यात वावरणार्‍या प्रत्येक व्यक्तीने आदर्शवत जीवन जगणे ही काळाची गरज बनली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =