You are currently viewing विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीचा जिल्हा दौरा

विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

विधानमंडळ रोजगार हमी योजना समिती गुरुवार दि. 21 ते शनिवार दि. 23 एप्रिल 2022 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

                गुरुवार दि. 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह, सिंधुदुर्ग (ओरोस) येथे एकत्र जमणे, सकाळी 9.30 ते 10 शासकीय विश्रामगृह, सिंधुदुर्ग (ओरोस ) येथे जिल्ह्यातील खासदार, आमदार, अध्यक्ष, जिल्हा परिषद, सभापती, बांधकाम सभापती, जि.प., पंचायत समित्यांचे सभापती यांच्याशी रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र बाबत अनौपचारिक चर्चा, सकाळी 10 ते 11 जिल्ह्यातील स्थानिक जनतेकडून व स्वयंसेवी संस्थांकडून रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र बाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तसेच जिल्ह्यातील रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र अंतर्गत सुरू असलेल्या कामांना भेटी देण्याबाबत जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा. सकाळी 11 ते 2 जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता ( रोहयो), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो), जिल्हा परिषद व ही योजना राबविणाऱ्या कार्यान्वयीन यंत्रणेचे विभागीय व जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी यांच्याशी रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना महाराष्ट्र या संबंधित समितीने पाठविलेल्या प्रश्नावलीबाबत चर्चा करण्यासाठी समितीची बैठक, दुपारी 2 ते 3 राखीव, दुपारी 3 ते 6 जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुन्हा चर्चेस सुरुवात ( चर्चा अपूर्ण राहिल्यास दि. 23 एप्रिल रोजी घेण्यात येईल ). रात्री शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे मुक्काम.

                शुक्रवार दि. 22 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 ते सायं. 6 जिल्ह्यातील रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सुरू असलेल्या कामांना भेटी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा. रात्री शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे मुक्काम.

                शनिवार दि. 23 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 समितीने जिल्ह्यातील रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र अंतर्गत कामांना दिलेल्या भेटीसंदर्भात आढळून आलेल्या उणिवा  व त्रुटींबाबत चर्चा  करण्यासाठी तसेच दि. 21 एप्रिल 2022 रोजी अपूर्ण राहिलेल्या प्रश्नावलीसंदर्भातील चर्चा करण्यात येईल.

                विधानसभा सदस्य मनोहर चंद्रिकापुरे हे या समितीचे प्रमुख असून समिती सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. विधानसभा सदस्य अनिल बाबर, ज्ञानराज चौगुले, उदयसिंग राजपुत, महेंद्र थोरवे, बबनराव शिंदे, अतुल बेनके, सुनिल भुसारा, शिरीष चौधरी, ऋतुराज पाटील, विक्रमसिंह सावंत, बबनराव यादव, दादाराव केचे, समीर मेघे, हरिष पिंपळे, समीर कुणावार, भिमराव तापकीर, ॲड. आकाश फुंडकर, दिलीप बोरसे, राजेश पाटील, विधान परिषद सदस्य नरेंद्र दराडे, अमोल मिटकरी, राजेश राठोड, रामदास आंबटकर, गोपीचंद पडळकर, कपिल पाटील ( विशेष निमंत्रित).

                या समितीसोबत पुढील अधिकारी असणार आहेत. उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव रविंद्र जगदाळे, कक्ष अधिकारी नितीन आहेर, समिती प्रमुखांचे स्वीय सहाय्यक शशांक सोनावणे, सहाय्यक कक्ष अधिकारी यशवंत तांडेल, प्रमोद उतेकर, लिपिक – टंकलेखक किशोर आरेकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 3 =