You are currently viewing “….. जठारांच्या केसाला जरी धक्का लागला तर अख्खा सिंधुदुर्ग पेटून उठेल !!

“….. जठारांच्या केसाला जरी धक्का लागला तर अख्खा सिंधुदुर्ग पेटून उठेल !!

– भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी दिला इशारा

चिपळूण म्हणजे शिवसेना आणि खासदार विनायक राऊत यांची खाजगी जहागिरी नाही हे लक्षात घेऊन शिवसेनेच्या नेत्यांनी धमक्या द्याव्यात. प्रमोद जठार हे आमचे नेते आहेत, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा, अख्खा सिंधुदुर्ग पेटून उठेल, असा सणसणीत इशारा सिंधुदुर्गचे भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी दिला आहे. हाथी चले अपनी चाल, कुत्ते भोंके हजार! प्रमोद जठार त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार चिपळुणमध्ये येतीलच, कोण मायका लाल त्यांना अडवायची हिंमत दाखवतो तेच आम्ही पाहतो, असे प्रतिआव्हान परुळेकर यांनी दिले आहे.

“जठारांनी चिपळूणात पाय ठेवला तर शिवसेना काय असते ते दाखवून देऊ” अशी धमकी देणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि अन्य नेत्यांचा भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

खासदार विनायक राऊत हे कर्मदारिद्री खासदार आहेत, हे त्यांनी आपल्या कर्मानेच सिद्ध केले आहे. जे आहे ते सांगायला तुमची कसली भीती आलीय? काय मोंगलाई लागून गेली आहे का? आम्ही हे पळपुटे खासदार राऊत यांच्या तोंडावर एकदा नव्हे तर हजारदा सांगू. प्रमोद जठार यांचा उल्लेख रिफायनरीचे दलाल म्हणून करणाऱ्या तुमच्या खासदाराला प्रमोद जठार यांनी दलाली सिध्द करा, नाहीतर कणकवलीच्या पटवर्धन चौकात जाहीर माफी मागा असे आव्हान दिले होते. त्या आव्हानापासून पळ काढणाऱ्या पळपुट्या खासदाराचा एवढा पुळका येत असेल, तर त्यांना आव्हान स्वीकारायची हिंमत दाखवायला सांगा. त्यांना कर्मदारिद्री म्हणायला जठारच कशाला हवे, कोकणातली तमाम जनतादेखील त्यांना कर्मदारिद्री खासदार म्हणते आहे. तेव्हा चिपळूणमध्ये फिरू न देण्याची भाषा तुमची तुमच्याकडे ठेवा. खासदार विनायक राऊत यांना काय ते चिपळूणमध्ये खासदार म्हणून शेवटचेच फिरून घ्यायला सांगा. कोकणी जनताच निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा इथे पाय ठेवायला देणार नाही एवढे निश्चित, असा टोला परुळेकर यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 3 =