You are currently viewing डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या होणार अणाव समाजमंदिराचे उदघाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या होणार अणाव समाजमंदिराचे उदघाटन

कुडाळ तालुक्यातील अणाव समाजमंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उद्या दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वाजता आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात येणार आहे. आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून १० लाख रु खर्चून उभारण्यात आलेल्या समाजमंदिराचे उदघाटन याप्रसंगी करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत उपस्थित राहणार आहेत. तरी याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, माजी उपसभापती जयभारत पालव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा