You are currently viewing भारनियमनाविरोधात कणकवलीत भाजप आक्रमक

भारनियमनाविरोधात कणकवलीत भाजप आक्रमक

महावितरणच्या कार्यालयावर धडक देत विचारला जाब

कणकवली

कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात लोडशेडिंग केले जात आहे . या विरोधात कणकवलीत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली . कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना लोडशेडिंगबाबत जाब विचारत परीक्षा सुरू असताना लोडशेडिंग कराल तर विजवितरणच्या गेटवरच ठिय्या देऊ , प्रसंगी विजवितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकू असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे व भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला .

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून लोडशेडिंग सुरू झाले आहे . देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राज्य लोडशेडिंग मुक्त होते जिल्ह्यात आणि तालुक्यात सध्या शालेय परीक्षा सुरू आहेत . परीक्षा कालावधीत लोडशेडिंग करून शालेय विद्यार्थ्याचे नुकसान करू नका . अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असेही भाजपा पदाधिकाऱ्यांनी श्री. मोहिते यांना ठणकावले . कमी विजदाबामुळे चिरेखाण व्यावसायिकांच्या मोटर जळून लाखोंचे नुकसान झाले आहे . याबाबत रिले बदलला नाही तर जळालेल्या सर्व मोटर आणून तुमच्या केबिनमध्ये टाकू असे उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांनी ठणकावले . ब्रेकर खराब असल्यामुळे लो व्होल्टेज ची अडचण असल्याचे श्री मोहिते यांनी सांगितले . यावेळी भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत , तालुका सरचिटणीस तथा माजी उपसभापती महेश गुरव , पिसेकामते सरपंच सुहास राणे , भाजपा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत, वागदे माजी सरपंच संदीप सावंत , समीर प्रभूगावकर , हनुमंत बोंद्रे , प्रसाद देसाई , सुशील सावंत , पप्पू पुजारे , विजय कदम , सदा चव्हाण , हरेश पाटील आदी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा