You are currently viewing ज्ञान-अज्ञान…

ज्ञान-अज्ञान…

 

*सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर सर्वसाधारण माणसाचे अज्ञान प्रचंड असते.सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याजवळ प्रचंड अज्ञान आहे,याचे सुद्धा माणसाला ज्ञान नसते.त्याचप्रमाणे सर्वात मोठे नवल म्हणजे परंपरेने आलेल्या अज्ञानाला सुद्धा लोक ज्ञान समजूनच कवटाळून बसलेले असतात.त्याचप्रमाणे सर्वात विस्मयकारक गोष्ट अशी की, माणसाला त्याचे हित नेमके कशात आहे हेच ज्ञात नसते.पोटाल मोठा धोंडा बांधून जर माणसाने सागरात उडी टाकली तर तो सरळ तळाला जाईल हे निश्चित,त्याचप्रमाणे अज्ञानाचा प्रचंड घोडा पोटाशी बांधलेला माणूस भवसागरात उतरला तर तो सरळ रसातळाला जाईल,हे सांगावयास ज्योतिषाची गरज नाही.म्हणून अखिल मानवजात सुखी होण्यासाठी या अज्ञानरूपी घोड्याचा त्याग करून माणसाने जानरूपी भोपळा पोटाशी बांधणे आवश्यक आहे. शहाणपण (wisdom) जेथून निर्माण होते त्याला जान असे म्हणतात आणि हेच जान माणसाला सुख,शांती,समाधान, यश,उत्कर्ष व उन्नती प्राप्त करून देण्यास समर्थ ठरते.याच ज्ञानाचे दुसरे अंग म्हणजे आत्मज्ञान हे होय. माणूस आज स्वतःचे खरे स्वरूप हरवून बसलेला असून प्रत्यक्षात तो खोटाच मुखवटा धारण करून जीवन जगत असतो.परंतु माणसाच्या अज्ञानाची कमाल म्हणजे,त्याला तो खोटाच मुखवटा धारण करून जीवनात वावरत आहे,याचेच ज्ञान नसते म्हणून आत्मस्वरूपाची झालेली विस्मृती नष्ट होऊन स्वस्वरूपाची स्मृती माणसात जागृत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.ज्या ज्ञानाने आत्मविस्मृतीचे अज्ञान स्पष्ट होऊन स्वस्वरूपाची स्मृती जागृत होते, त्याला आत्मज्ञान असे म्हणतात. माणसाचे हित व कल्याण हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यातच असते व माणसाचा जन्म सुद्धा त्यासाठीच असतो.*

 

🎯 *आपण जेव्हा आपणाला पाहतो तेव्हा आपण आपोआप नाहीसे होऊन देवाचे चरण उदयाला येतात.हे देवाचे चरण म्हणजेच देवाचे ज्ञान-दिव्यज्ञान-ज्ञानदेव.*

 

🎯 *अज्ञान नाहीच असे म्हणणाऱ्यांचे अज्ञान अवर्णनीय आहे.*

 

🎯 *स्वस्वरूपाच्या स्मृतीची जागृती ज्या ज्ञानात उदयाला येते ते ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान,यांच्या उलट ज्या ज्ञानात स्वस्वरूपाची विस्मृती नांदत असते ते ज्ञान म्हणजे ब्रह्मघोटाळा.*

 

🎯 *ज्ञान-अज्ञानाच्या पलीकडे जाऊन स्वस्वरूपी स्थिर झालेल्या सिद्ध राजहंमाने ‘अज्ञान नाहीच’ असे म्हणणे व देहबुद्धिच्या चिखलात रुतून बसलेल्या बद्ध बगळ्याने ‘अज्ञान नाहीच’ असे म्हणणे यात काहीतरी साम्य आहे काय?*

 

🎯 *जे विद्वान असतात ते स्वतःला अल्पज समजतात परंतु जे अल्पज्ञ असतात ते मात्र स्वतःला सर्वज्ञ समजतात.*

 

🎯 *ज्ञान या शब्दाचा खरा अर्थ अनुभव.*

 

🎯 *अज्ञान,विज्ञान व प्रज्ञान ही मूळ ज्ञानाचीच रूपे होत.*

 

🎯 *ज्ञानाची धारणा करणारी जी ती श्रद्धा.*

 

🎯 *ज्ञान हा ईश्वर आहे त्याचप्रमाणे ते ऐश्वर्य आहे.*

 

🎯 *ज्ञानाच्या अंगाने देवाला पहावे आणि आनंदाच्या अंगाने त्याला भोगावे.*

 

🎯 *मोठा धोडा पोटाशी बांधून जर माणसाला पाण्यात सोडला तर तो सरळ तळाला जाईल;त्याप्रमाणे अज्ञानाचा धोडा पोटाशी धरून संसार सागरात उतरलेला माणूस रसातळाला गेला नाही तरच नवल.*

 

🎯 *अज्ञान व अहंकार एकमेकांना पोसत पोसत पुष्ट होतात व सरतेशेवटी ते आपल्या आश्रयदात्यालाच नष्ट करतात.*

 

🎯 *ज्ञान हे शस्त्र,अस्त्र व शास्त्र आहे.ज्ञान हे शक्ती,बल व सामर्थ्य आहे.ज्ञान हे धन,संपत्ती व ऐश्वर्य आहे.ज्ञान हा देव,ईश्वर व परमेश्वर आहे,म्हणून ज्ञानी व्हा व धन्य व्हा.*

 

*🙏सद्गुरू श्री वामनराव पै.🙏*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − nine =