जीवनाच्या सर्वच क्षेत्रात मूर्ख व सूज्ञ माणसांची भेट होत असते.अर्थात्, मूर्खाची संख्या मोठी असते तर सूज्ञांची संख्या छोटी असते. *सामाजिक जीवनात अनेक माणसांची भेट होणे क्रमप्राप्त असल्यामुळे भेटलेली माणसे मूर्ख आहेत का सूज्ञ आहेत याचा ‘कानोसा’ भेटता क्षणीच घेणे आवश्यक असते.माणसाचा चेहरा हा त्याच्या स्वभावाचा आरसा असल्यामुळे असा कानोसा घेणे सहजसाध्य नसले तरी प्रयत्न साध्य मात्र असते.*
🎯 *मूर्ख व सूज्ञ माणसांशी वेगवेगळ्या प्रकाराने वागायचे असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.अन्यथा जीवनात अनेक बिकट समस्यांना सामोरे जाण्याची पाळी आल्याशिवाय रहाणार नाही.*
🎯 *अक्कलशून्य माणसे दुसऱ्यांची निंदा-नालस्ती करण्यात धन्यता मानतात तर बुद्धिवान माणसे इतरांचे गुण पारखून त्यांचे कौतुक करण्यात सुखावतात.*
🎯 *मूर्ख व अहंकारी माणसास काही शिकविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भिंतीवर डोके आपटण्यासारखेच व्यर्थ होय.*
🎯 *सिद्धींचे प्रदर्शन करणारे अडाणी तर त्यांच्या मागे धावणारे मूर्ख शिरोमणी.*
🎯 *मूर्ख माणूस व पशू यात फरक आहे तो फक्त दोन पायांचा.*
🎯 *मेंदू न वापरणारे ते मेंढरू समजावेत,अशा मेंढरांचाच सर्वत्र सुकाळ झालेला दिसतो.*
🎯 *मूर्ख असून जो स्वत:ला शहाणा समजतो त्याला सुधारण्याचे सामर्थ्य साक्षात् ब्रह्मदेवालाही नाही.*
🎯 *स्पष्टवक्तेपणाच्या नावाखाली उध्दटपणाचे प्रदर्शन करण्यात जे भूषण मानतात ते महामूर्ख समजावेत.*
🎯 *परिणामांचा प्रथम विचार करून जे कर्म करतात ते सूज्ञ,तर कर्म केल्यावर मग परिणामांचा विचार करतात ते मूर्ख.*
🎯 *मूर्ख माणसाकडून शहाणपणाची अपेक्षा करण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा त्याच्यापासून दोन हात दूर रहाण्याचा शहाणपणा करण्यात खरे शहाणपण आहे.*
🎯 *वाचन व श्रवण हे ज्ञानाचे दोन मार्ग ज्याने स्वत:हून बंद करून घेतले तो द्विपाद पशू जाणावा.*
🎯 *अक्कलशून्य माणसे दुसऱ्यांची निंदा-नालस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात कारण ‘निंदा करणे’ ही एकच गोष्ट अशी आहे की त्यासाठी अक्कल लागत नाही.*
🎯 *मूर्ख माणसे मेल्यानंतर स्वर्गाला जाण्याची वाट पहातात तर सूज्ञ माणसे या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.*
🎯 *कर्मकांडांत धार्मिकतेचे दिखाऊ प्रदर्शन असते तर माणुसकीत धार्मिकतेचे खरे दर्शन घडते.*
🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏