You are currently viewing वागदेतील अपघातात कणकवलीतील बाळा मलुष्टे ठार

वागदेतील अपघातात कणकवलीतील बाळा मलुष्टे ठार

महामार्गावर वागदे डगळघाटी येथे घडला अपघात

कणकवली:

ओसरगाव येथून घरी परतत असलेल्या कणकवली शहरातील मारुती आळी येथील रहिवाशी प्रसन्ना ऊर्फ बाळा मलुष्टे या स्लायडिंग व्यावसायिकाच्या दुचाकीला मागाहून येणाऱ्या गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाळा मलुष्टे हे गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कणकवलीत वागदे डगळघाटी येथे घडला. नंतर बराच वेळ बाळा हे जागेवरच पडुन होते. मात्र त्यांना उपचाराकरता नेण्यासाठी कोणती गाडी उपलब्ध झाली नव्हती. त्यानंतर याबाबत माहिती मिळताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी 108 रुग्णवाहिकेस संपर्क साधत अपघाताची माहिती दिली. तसेच नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी धडक चारचाकी चालक गाडी घेऊन पळाला आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान बाळा मलुष्टे यांच्या सोबत असलेला अभी आचरेकर यांनाही किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर मागाहून धडक देत पसार झालेल्या इको चार चाकी चालकाला जानवली पुला दरम्यान पकडण्यात आले. चार चाकी सह त्याला पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले. बाळा मलुष्टे हे कणकवलीतुन ओसरगाव येथे आपल्या कामानिमित्त गेले होते. स्लाइडिंग व्यावसायिक असल्याने ते अनेकांचे परिचित होते. प्रसन्ना या ऐवजी बाळा या नावाने ते प्रसिद्ध होते. गाडीची धडक बसल्याने रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही एम चव्हाण, पोलीस हवालदार रुपेश गुरव, उबाळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. बाळा यांच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी, असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवलीतील अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा