You are currently viewing ” रेशनिंग चे चोर “

” रेशनिंग चे चोर “

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

सर्वांना दोन वेळचे पोटभर जेवण मिळावे आणि सगळ्यांचे व्यवस्थित पालन पोषण व्हावे. ही आपली किमान गरज असते आणि आहे. पावसाची अनियमितता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे स्वातंत्र्यानंतर बराच काळ आपणांस अन्न धान्य कमतरतेला अन्न धान्य तुकड्याला सामोरे जावे लागले. अन्न धान्य परदेशातून परराज्यातून आयात करून अन्न धान्याची तुट भरून काढण्याचा प्रयत्न केला जात होता. पुढं सिंचन व्यवस्था. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. सुधारित बि बियाणे . रासायनिक खते . या सर्व तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्यांचा परिणाम म्हणून १९७० चया सुमारास आपण धान्य उत्पादन याची बरिच उच्च पातळी गाठली या बदलाला ” हरित क्रांती” असं म्हणलं जाते. हरित क्रांती मुळे धान्याचे उत्पादन वाढले. देश अन्न धान्य बाबतीत सवालंबी बनला. मात्र खाद्य तेलाचा प्रश्न आजही अपुरा राहिला आहे. खाद्य तेलाच्या बाबतीत आजही आपण माग आहोत
धान्य उत्पादन जेव्हा कमी होते तेव्हा अन्न धान्याचे वाटप व्हावे म्हणून ” रेशनिंग म्हणजे सरकार मान्य धान्यपुरवठा नियंत्रित करण्याचे धोरण अंमलात होतें. आजही ही संकल्पना मर्यादित स्वरूपात ही व्यवस्था अस्तित्वात आहे. सर्वांना पुरेसे अन्न धान्य मिळावे हा जसा हेतू होता तसेच ते अन्न धान्य स्वच्छ निवडक रास्त आणि स्वस्त भावात मिळावं हाही त्यामागचा हेतू होता. धान्याचा मुबलक पुरवठा असून भागात नाही. सर्वांना परवडेल अशा भावात मिळावं. त्यासाठी सरकार नियंत्रित भावात धान्याचा पुरवठा करते. त्यामुळे अन्न धान्य दर्जाचा प्रश्न उभा राहतो. मात्र आशा वेळी बाजारात उपलब्ध असणारे सकस धान्य गोरगरीब खरेदी करु शकत नाही त्यामुळे रेशन चे मिळणारे अन्न धान्य गोरगरीबांना खावं लागतं म्हणजे धान्याचे उत्पादन वाढवून किंवा रेशन दुकानांची संख्या वाढवून गोरगरीब लोकांचा प्रश्न मिटणार नाही . पोषक अन्न धान्य रास्त भावात मुबलक मिळण्यासाठी रेशन दुकानांवर टाच आणण्याची गरज आहे
शासनाने गोरगरिबांना रास्त स्वस्त निवडक स्वच्छ अन्न धान्य मिळण्यासाठी रेशनिंग दुकान ही संकल्पना अमलात आणली पण आज याचा बाजार झाला आहे. पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून रेशन दुकानदार आज रेशन ची चोरी करत आहेत. रेशन दुकानदार फसवे प्रश्न व विविध शासन नियमांत नसणारा अटि शर्ती घालून गोरगरीब रेशन लाभार्थी यांची फसवणूक करत आहेत. दुकान वेळेवर न उघडणे मनाला येईल तेव्हा दुकान उघडणे. थम उठत नाही. आधारकार्ड लिंक नाही. ज्या महिन्याचे रेशन त्या महिन्यातच घेणे दुसर्या महिन्यात देणारं नाही. पाच किलो धान्य वाटण्याचे असल्यास तीनच किलो वाटप आम्हाला वरण कमी आलं आहे असं सांगितलं जातं. तुमचं युनिट कमी झाले आहे. अशी फसवी आणि दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात आहेत
सर्वांना आपल्या गावात . तालुका. जिल्हा. राज्य. देश. यामध्ये किती रेशनकार्ड धारक आहेत याची माहिती असणं गरजेचं आहे किती रेशनिंग दुकान आहेत याची सुध्दा माहिती असणे गरजेचे आहे. त्यामध्ये असणारे शिधापत्रिका धारक . दारिद्र्य रेषेखालील किती. प्रधान लाभार्थी शिधापत्रिका धारक किती. केशरी शिधापत्रिका धारक किती. शुभ्र शिधापत्रिका धारक किती. हे पाहण्याचा आपण कधीचं प्रयत्न केला नाही कारणं आपणांस याची गरज नाही
इस्लामपूर शहरात असणारी रेशन दुकान यादी खाली जाहीर करत आहे. आजच हि सर्व रेशन दुकान ज्या मालकाच्या नावावर रजिस्ट्रेशन आहे तेच चालवत आहेत कां? याची माहिती आजच घ्या . कारणं मालक एकच आणि दुकान चार चार असा प्रकार सुरू आहे. याला कारणीभूत आहेत पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या जवळच्या लोकांना रेशन दुकान चालविण्यास दिली आहेत.
रेशनिंगचे नियम – थोडक्‍यात:-
● रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.
● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.
● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.
● रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.
● एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.
● ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.
● रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.
● रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.
● रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.
● बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.
● वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.
● दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.
आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणुन
महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.
आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.
https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp
रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.
https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp
रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे
https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp
रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.
http://mahafood.gov.in/pggrams/
वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.
*महत्वपुर्ण_माहिती*
*🍀स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर..!*🌴
*गहू – २ रू. किलो*
*तांदूळ- ३ रू. किलो*
*साखर – २० रू . किलो*
*तुरदाळ- ३५ रू. किलो*
*उडीद दाळ – ४४ रू किलो*
*घासलेट (रॉकेल #केरोसीन ) – २४:५० ( चोवीस रपये पन्नास पैसे लीटर )*
जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर घेत असेल व तुम्हाला माल (रेशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक #पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता..!
*चोरांना खुलेआम आपली लूट करन्याची संधी देवू नका…!*
सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी..!
जागा ग्राहक जागा ! आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या.
भारत सरकार द्वारा जनहीतार्थ जारी………वरील माहीती ग्रामिण भागातिल शेतकरी,शेतमजुर ,अश्या गरजवंतापर्यंत पोहचवा…
* ( एम आर पाटील) पी टी जाधव लाल चौक ( इस्लामपूर) मोबाईल नंबर ( ९६६५५४८०८१)
मशिन नंबर १५३१११०००३१४
* आर जे पतंगे गणेश भाजी मंडई ( इस्लामपूर)
मोबाईल नंबर ९८९०१९३५३२
मशिन नंबर १५३१११०००३१५
* एस बी शेटे भाजी मंडई ( इस्लामपूर)
मोबाईल नंबर ९८९०३९४७६३
मशिन नंबर १५३१११०००३१६
* एस जी मुदगल संभाजी चौक ( इस्लामपूर)
मोबाईल नंबर ७३५००३०५०६
मशिन नंबर १५३१११०००३१७
* व्हि एस गायकवाड मार्केट यार्ड ( इस्लामपूर)
मोबाईल नंबर ९४२२६१५९७५
मशिन नंबर १५३१११०००३१८
* एस बी करांडे महावीर चौक ( इस्लामपूर)
मोबाईल नंबर ९४२३२७२८७०
मशिन नंबर १५३१११०००३१९
* सदाशिव बंडू कोरे वाकोबा मंदिर ( इस्लामपूर)
मोबाईल नंबर ९८६०२८१६०१
मशिन नंबर १५३१११०००३२०
* आर डी पाटील धनगर गल्ली इस्लामपूर
मोबाईल नंबर ९८२२५१७११७
मशिन नंबर १५३१११०००३२१
* माणिक रामचंद्र पाटील पाटील गल्ली उरुण इस्लामपूर
मोबाईल नंबर ९४२१३६६९९७
मशिन नंबर १५३१११०००३२२
* शामराव रामचंद्र पवार तानाजी चौक इस्लामपूर
मोबाईल नंबर ९७६७३६३००५
मशिन नंबर १५३१११०००३२३
* रमेश आनंदराव वडे शिवनगर इस्लामपूर
मोबाईल नंबर ९३७२१४९६२६
मशिन नंबर १५३१११०००३२४
* एस के नागे मंत्री काॅलनी इस्लामपूर
मोबाईल नंबर ९८५०२९ ९२०६
मशिन नंबर १५३१११०००३२५
* पी एन ठोंबरे धनगर गल्ली इस्लामपूर
मोबाईल नंबर ९८९०९३६१६६
मशिन नंबर १५३१११०००३२६
* श्रीमंती अंजनी ना वडे महादेव नगर डवरीगलली
मोबाईल नंबर ७३५०१२१२९२
मशिन नंबर १५३१११०००३२७
* सौ सुमन बाळासो कोरे आष्टा नाका इस्लामपूर
मोबाईल नंबर ९२२६३६९९२५
मशिन नंबर १५३१११०००३२८
* मुकुंद ज्ञानु कांबळे बुरुड गल्ली इस्लामपूर
मोबाईल नंबर ९२२६२८६६७२
मशिन नंबर १५३१११०००३२९
* के बी वाकळे गांधी चौक इस्लामपूर
मोबाईल नंबर ९८६०८४४२९६
मशिन नंबर १५३१११०००३३०
* सावळा चंद्रु खवळे अकबर मोहल्ला शिराळ नाका इस्लामपूर
मोबाईल नंबर ८३०८०२५९६२
मशिन नंबर १५३१११०००३३१
* सौ सुवर्णा सुभाष भिंगारडे हनुमाननगर इस्लामपूर
मोबाईल नंबर ९९२१४६०७९५
मशिन नंबर १५३१११०००३३२
* आप्पासो ब पाटील संभूआपपा मठाजवळ इस्लामपूर
मोबाईल नंबर ९३७२१४९३१९
मशिन नंबर १५३१११०००३३३
* संपतराव हिंदूराव पाटील एम डी पवार चौक इस्लामपूर
मोबाईल नंबर ९७६७८३८२५०
मशिन नंबर १५३१११०००३३४
* नयु लक्ष्मी भिशी मंडळ महावीर चौक इस्लामपूर
मोबाईल नंबर ७३८५३१०६१२
मशिन नंबर १५३१११०००३३५
* बुरुड समाज औ सोसायटी बुरुड गल्ली इस्लामपूर
मोबाईल नंबर ९८५०२९ ९२०६
मशिन नंबर १५३१११०००३३६
* उदय मारुती कळसे खांबे गल्ली इस्लामपूर
मोबाईल नंबर ९२७००६९७२३
मशिन नंबर १५३१११०००३३७
* डॉ बाबासाहेब आंबेडकर सोसायटी शिवनगर इस्लामपूर
मोबाईल नंबर ९२७२६८२०२१
मशिन नंबर १५३१११०००३३८
* डी के रोटे यललामा चौक
इस्लामपूर
मोबाईल नंबर ९६६५६०५४६६०
मशिन नंबर १५३१११०००३६८
* राजवर्धन पांडुरंग लाड निनाई नगर इस्लामपूर राजाराम नगर
मोबाईल नंबर ९४२३२७२६६२
मशिन नंबर १५३१११०००३८९
* कुसुमताई रा ब महिला बचत गट उरुणवाडी इस्लामपूर
मोबाईल नंबर ९२२६९० २८१४
मशिन नंबर १५३१११०००३९०
* ज्ञानेश्वरी महिला बचत गट हनुमान नगर इस्लामपूर
मोबाईल नंबर ९२७१४०३०४०
मशिन नंबर १५३१११०००३९३
* सिद्दि महिला बचत गट किसान नगर इस्लामपूर
मोबाईल नंबर ९८३४०८७६३५
मशिन नंबर १५३१११०००३९४
* पी टी जाधव भाजी मंडई
इस्लामपूर
मोबाईल नंबर ९०९६४२४२४१
मशिन नंबर १५३१११०००४०३
आजच वरिल प्रमाणे रेशन दुकान ज्याच्या नावावर आहे तोच ते दुकान चालवितो का ते पहा नसेल तर लगेच संबंधित दुकानदार यांची तक्रार करा
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा