कणकवली
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवली आयोजित कणकवली तालुका मर्यादित मोफत नवोदय विद्यालय सराव चाचणी 6 एप्रिल 2022 रोजी मारुती विद्यामंदिर केंद्रशाळा जाणवली या शाळेत आयोजित करण्यात आली होती .या परीक्षेला 86 विद्यार्थी बसलेले होते त्यातून 13 विद्यार्थी पहिल्या दहा मध्ये आलेले आहेत .प्रथम क्रमांक -मयंक महेश चव्हाण (एस एम एस हायस्कूल कणकवली )95 % ,द्वितीय क्रमांक – प्रथमेश प्रकाश चव्हाण (कणकवली नंबर – 2 )87 . 50 % ,तृतीय क्रमांक – उत्कर्ष जयप्रकाश परब (कासार्डे नंबर -१ )86 . 25 , उर्वी गुरुप्रसाद पाटील (कासार्डे नंबर – १ )85% ,पाचवा – अनामय श्रीकृष्ण खांडेकर (एस एम हाय स्कूल कणकवली )83 . 75 %, सहावा -सोहम शामराव बिरादार ( तळेरे नंबर -१ ) 82. 50%, सातवा -दीप्ती शाम यादव (जिल्हा परिषद शाळा कणकवली नंबर -5 ) 81 . 25 %,विश्वजीत संतोष सातोसे (एस एम हायस्कूल कणकवली ) 81 . 25 % ,आठवा -धन्यता समीर सातोसे (केंद्रशाळा कासार्डे नंबर – १ ) 80 % ,वरद उदय भाकरे (कणकवली नंबर 3 ) 80% ,गायत्री विजय वरक (सरस्वती हायस्कूल नांदगाव ) 80% ,नववा – संतोषी सुशांत आळवे (कणकवली नंबर 3 ) -78 .75 टक्के ,दहावा – प्रज्वल विजय कदम (केंद्रशाळा कासार्डे नंबर १ )77 . 50 % सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन राज्य संघटक किसन दुखंडे ,जिल्हाध्यक्ष -संतोष पाताडे ‘ तालुकाध्यक्ष – दशरथ शिंगारे ,महिला जिल्हाध्यक्ष आशा गुणीजन ,तालुका सचिव -श्रीराम विभुते ,यांनी केले .परीक्षा यशस्वीतेसाठी परीक्षा विभाग प्रमुख म्हणून मंगेश खांबलकर – कार्याध्यक्ष शिक्षक भारती कणकवली तर व्यवस्थापक म्हणून संजय कोळी – मुख्य संघटक शिक्षक भारत कणकवली यांनी उत्कृष्ट काम केले .परीक्षा यशस्वीतेसाठी शिक्षक भारती कणकवली तालुका पदाधिकारी कल्पना सावंत , दीपिका चव्हाण , गुरुप्रसाद पाटील ,मदनकुमार नारागुडे ,रूपाली चव्हाण ,अनुजा रावराणे यांनी विशेष प्रयत्न केले .शिक्षक भारती कणकवली यांनी आयोजित केलेल्या परीक्षेमुळे कणकवली तालुक्यातील नवोदय विद्यालय निवड चाचणी करिता प्रविष्ठ विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचा सराव झाला याबद्दल शिक्षक भारती कणकवलीच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे .