-संदेश पारकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी
कणकवलीतील तीन मजली इमारत बेकायदेशीरपणे पाडल्याबाबत शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन एसआयटी गठीत करण्याची मागणी केली.
यावेळी श्री.आदित्य ठाकरे यांनी या सर्व प्रकाराची माहिती घेऊन कुणालाही पाठीशी न घालता दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन संदेश पारकर यांना दिले.
याबाबतचे निवेदन मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयामार्फत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांना देखील दिले असल्याची महिती संदेश पारकर यांनी दिली.