You are currently viewing केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा उद्या ७० वा वाढदिवस जिल्हा भाजप सिंधुदुर्गनगरीत होणार साजरा…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा उद्या ७० वा वाढदिवस जिल्हा भाजप सिंधुदुर्गनगरीत होणार साजरा…

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ प्रसाद लाड राहणार उपस्थित

ओरोस

भाजप नेते तथा केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचा १० एप्रिल रोजी ७० वा वाढदिवस आहे. राणे केंद्रीयमंत्री झाल्यानंतर पहिला वाढदिवस असल्याने व केंद्रात महत्वाचे खाते मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्यावतीने हा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रम दुपारी ४.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे होत असून यावेळी स्वतः मंत्री राणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष आ प्रसाद लाड उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजन तेली, सरचिटणीस डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे याबाबत माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप युवा मोर्चाचे नेते विशाल परब, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, देवेन सामंत, संतोष वालावलकर, पांडुरंग मालवणकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तेली व डॉ कुलकर्णी यांनी, तीन दृष्टीने केंद्रीयमंत्री राणे यांचा उद्याचा वाढदिवस महत्वाचा आहे. केंद्रीयमंत्री झाल्यानंतर प्रथमच वाढदिवस होत आहे. त्यांच्या आयुष्यातील ७० वा वाढदिवस आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर एका मोठ्या पदाची जबाबदारी दिली आहे. आपल्या खात्याचे ते वेगाने काम करीत आहेत. त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यासाठी व व्यावसायिक वाढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या कारणामुळे हा वाढदिवस वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे हा वाढदिवस कार्यकर्यांसाठी उत्साहाची मोठी पर्वणी आहे, असे सांगितले.

तालुकास्तरावर विविध कार्यक्रम भाजपच्यावतीने केंद्रीयमंत्री राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक तालुक्याच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ते कार्यक्रम नियोजित वेळेत होणार आहेत. रक्तदान शिबिर, फळ वाटप, निराधारांना मदत आदी कार्यक्रम घेतले जाणार आहे. तसेच ६ एप्रिल हा भाजप स्थापना दिन आहे. यानिमित्त पंधरावडा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यातील काही कार्यक्रमांचा शुभारंभ यावेळी केंद्रीयमंत्री राणे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे, असे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.

केंद्रीयमंत्री झाल्यानंतर परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने नारायण राणे जिल्ह्यात दाखल होत असताना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. राणे यांचे नेतृत्व मानणारी माणसे राजकीय पक्षाच्या पलीकडे आहेत. या प्रेम करणाऱ्या व्यक्ती व कार्यकर्ते यांना एकाच ठिकाणी शुभेच्छा देता यावा, यासाठी शरद कृषी भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मोठ्या उपस्थितीत होणार आहे, असे यावेळी डॉ कुलकर्णी यांनी सांगितले. विशाल दातृत्वासाठी भव्य कार्यक्रम युवा मोर्चा नेते विशाल परब यांनी बोलताना, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे नेतृत्व विशाल आहे. या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीचे सर्व कार्यक्रम भव्यदिव्य झाले आहेत. तसाच हा कार्यक्रम होणार आहे, असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =