You are currently viewing कणकवलीत केंद्रीय उद्योग मंत्री ना.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व भाजपा स्थापना दिन सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा..

कणकवलीत केंद्रीय उद्योग मंत्री ना.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व भाजपा स्थापना दिन सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा..

 

केंद्रीय उद्योग मंत्री ना.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व भाजपा स्थापना दिन सप्ताह साजरा करण्यासाठी आमदार नितेश राणे पुरस्कृत भाजपा कणकवली ग्रामीण मंडल जिल्हा परिषद विभाग निहाय ‘कमळ चषक क्रिकेट स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. तसेच कणकवली भाजपा ग्रामीण मंडल मधील १४ शक्तिकेंद्रप्रमुखांच्या घराच्या दरवाजावर शक्तिकेंद्रप्रमुखांच्या नावाचा नामफलक सुद्धा लावण्यात येणार असल्याची माहिती भाजपा कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत कणकवली पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे, माजी उपसभापती महेश गुरव, भाजप तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत उपस्थित होते. संतोष कानडे म्हणाले,या स्पर्धा १० एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत विभागवार पार पाडल्या जातील. यात कलमठ विभागात कलमठ लांजेवाडी येथे दि. १० एप्रिल व ११ एप्रिल या कालावधीत या स्पर्धा पार पडतील. तर जानवली विभागांतर्गत जानवली मारुती मंदिर येथे ११ व १२ एप्रिल रोजी, खारेपाटण विभागांतर्गत खारेपाटण रवळनाथ मंदिर १२ व १३ एप्रिल रोजी तर कळसुली विभागांतर्गत कळसुली ग्रामपंचायतसमोर दि. १३ व १४ एप्रिल या कालावधीत या स्पर्धा संपन्न होणार आहेत. तरी क्रिकेटपटूंनी व क्रीडारसिकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्ष संतोष कानडे यांनी केले आहे.तर उद्या ९ रोजी प्राथमिक शाळेतील मुलांना पावनखिंड हा चित्रपट दाखविला जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =