२ एप्रिल पासून सूरु आहे सुश्राव्य किर्तन उत्सव
प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम सेवा मंडळ हळवल (मुंबई) यांच्या वतीने हळवल येथील श्री. राम मंदिर येथे श्री. राम नवमी उत्सव दि. ०२ एप्रिल ते १० एप्रिल २०२२ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त २ एप्रिल गुढीपाडव्यापासून ९ एप्रिल पर्यंत भव्य किर्तन उत्सव साजरा केला जात आहे. कणकवली तालुक्यातील नामवंत किर्तनकार या किर्तन उत्सवात सुश्राव्य किर्तन सादर करत आहेत.
तर रविवार दि. १० एप्रिल २०२२ रोजी श्री. राम नवमी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता श्रीराम षोडशोपचार पूजा, सकाळी ०९ वा. उत्सवाचे ग्रामदेवतेला आमंत्रण, सकाळी १० वा. श्रीराम जन्माचे किर्तन , दुपारी १२ वा. श्री. राम जन्म सोहळा दर्शन व तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. श्रीराम पालखीची अभंग रामनामाच्या घोषात प्रदक्षिणा, दु. १.३० महाप्रसाद, सायं ६.३० ते ७. ३० वा. वारकरी भाविक व बालगोपाळांचा हरिपाठ, रात्रौ ८ ते ९ वा. श्रीराम प्रासादिक भजन मंडळ हळवल यांचे सुश्राव्य भजन सादर केले जाणार आहे. रात्रौ ९ वा. श्रीराम पालखीचे अभंग रामनामाच्या घोषात प्रदक्षिणा, रात्रौ ११ वा. किर्तन, रात्रौ १२ वा. श्री शेवराई रवळनाथ नाट्यमंडळ हळवल संचालक अरुण राणे यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थ प्रसाद व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सेवा मंडळ हळवल (मुंबई) यांच्या वतीने करण्यात आले आहे.