You are currently viewing ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कणकवली तालुका शाखा स्थापनेबाबत बैठकीचे आयोजन

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कणकवली तालुका शाखा स्थापनेबाबत बैठकीचे आयोजन

वैभववाडी

भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित आणि शासनमान्य असलेल्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या संस्थेची कणकवली तालुका शाखा स्थापन करण्याबाबतची विशेष बैठक रविवार दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ठिक १०.३० वा.हॉटेल महाराजा, विद्यामंदिर समोर कणकवली येथे आयोजित केली आहे.
संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला ग्राहक हा ख-या अर्थाने ‘राजा’ होण्यासाठी ग्राहकांचे संघटन आणि प्रबोधन महत्त्वाचे आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये ग्राहकांचे संघटन, ग्राहकांचे प्रबोधन व ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे पवित्र कार्य सुरू आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा शाखा कार्यरत असून वैभववाडी, देवगड, कुडाळ व सावंतवाडी येथे तालुका शाखा कार्यरत आहेत. कणकवली, दोडामार्ग येथे तालुका शाखा पुनर्स्थापित करण्यात येणार आहेत. तसेच मालवण आणि वेंगुर्ला येथे तालुका शाखा स्थापन करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. ग्राहकाचे अज्ञान, संघटितपणाचा अभाव आणि
ग्राहक संरक्षण कायद्याने प्राप्त झालेले हक्क,अधिकार आणि कर्तव्याकडे दुर्लक्ष यामुळे ग्राहकाची फसवणूक, अडवणूक होत आहे.
ग्राहक राजा जागृत होऊन लोकशाहीचा धागा होण्यासाठी कणकवली तालुका शाखा स्थापन करण्यासंदर्भात तालुक्याच्या विविध भागातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील. उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा