You are currently viewing दोडामार्ग युवा सेनेच्या समन्वयक पदी भगवान गवस, तर संघटकपदी संदेश राणे…

दोडामार्ग युवा सेनेच्या समन्वयक पदी भगवान गवस, तर संघटकपदी संदेश राणे…

दोडामार्ग

येथील युवासेनेच्या तालुका समन्वयक पदी भगवान गवस, तर तालुका संघटक पदी संदेश राणे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी नुकतीच जाहीर केली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, युवासेना दोडामार्ग तालुका प्रमुख मदन राणे, सरपंच संघटना अध्यक्ष श्री प्रेमानंद देसाई, जि. प. सदस्य संपदा देसाई, मिलिंद नाईक, बबलू पांगम, बाबाजी देसाई, सज्जन धाऊसकर, हर्षद सावंत, रामदास मेस्त्री, विजय गावडे आदिंसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा